बारसूतील कातळशिल्पांचा युनेस्कोपर्यंत पाठपुरावा करू; विनायक राऊत यांनी केले स्पष्ट

बारसूतील कातळशिल्पांचा दर्जा काढून घेतला आहे. दुसऱ्या गावातील कातळशिल्पाना दर्जा दिला जातो. मात्र, बारसूतील कातळशिल्पांचा दर्जा काढला जातो हे दुर्देव आहे.आम्ही कातळशिल्पांचे संरक्षण करण्यासाठी युनेस्कोपर्यंत पाठपुरावा करू आणि रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी दिला. रत्नागिरीतील संपर्क कार्यालयाच्या शुभारंभानंतर पत्रकारांशी खासदार विनायक राऊत यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे.

खासदार विनायक राऊत यांच्या रत्नागिरीतील संपर्क कार्यालयाचा रविवारी शुभारंभ करण्यात आला. अभ्युदयनगर येथील यशोधन अपार्टमेंट मध्ये संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. शुभारंभाप्रसंगी संपर्क कार्यालयात गणेशपूजन करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, माजी सुभाष बने, माजी जि.प.अध्यक्ष जयसिंग घोसाळे, रोहन बने, माजी उपाध्यक्ष उदय बने, संतोष थेराडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर,तालुकाप्रमुख प्रदीप साळवी,महिला जिल्हा संघटक वेदा फडके,तालुका संघटक साक्षी रावणंग व इतर मान्यवर उपस्थित होते.