‘पुरुषोत्तम’ प्रेक्षकांच्या भेटीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिक अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांची प्रस्तुती असलेला ‘पुरुषोत्तम’ हा सिनेमा लककरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमरापूरकर यांची कनिष्ठ कन्या रीमा अमरापूरकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून ज्येष्ठ कन्या केतकी अमरापूरकर या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहे.  या सिनेमात नंदू माधव यांची प्रमुख भूमिका असून किशोर कदम, देविका दफ्तरदार, केतकी अमरापूरकर आणि पूजा पवर हे कलाकारदेखील झळकणार आहेत. येत्या 10 मे रोजी अमरापूरकर मायलेकींचा ‘पुरुषोत्तम’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.