
पुसेगाव येथील श्री सेवागिरी विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही शाळा बंद करण्यात आली आहे.
पुसेगावच्या शेजारी असणाऱया एका गावातील एक विद्यार्थी श्री सेवागिरी विद्यालयात शिकत होता. त्याच्या आजेबांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी केली असता, संबंधित विद्यार्थीही पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे शाळेने सर्व विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या करून घेतल्या. यात सहा विद्यार्थी बाधित आढळले आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी कोरोनाचे नियम पाळून सर्वांना सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे. वातावरणातील बदलाने आपला पाल्य थोडाही आजारी असेल, तर त्याला वेळेत उपचार देणे गरजेचे असल्याचे गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भरडे यांनी सांगितल
























































