अभिनेत्रीच्या आयटम साँगवर बंदी घाला! पुरुषांसाठी काम करणाऱ्या संघटनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रपट आणि त्यातील गाणी हा कधीकधी वादाचा मुद्दा बनतो. विशेषतः आयटम साँग या प्रकाराला शब्द आणि सादरीकरण यांमुळे नेहमीच टीकेला सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा ही गाणी महिलांना उद्देशून असतात. पण, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका गाण्यामुळे पुरुषांसाठीच्या एका संघटनेने गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

या चित्रपटाचं नाव पुष्पा असं असं आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लु अर्जुन याची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच चित्रपटाच्या एका गाण्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

हे गाण अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्याच्या शब्दांवरून वाद निर्माण झाला आहे. पुरुषांसाठी काम करणाऱ्या एका संघटनेने या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

या गाण्याचे बोल पुरुषांची प्रतिमा मलीन करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. पुरुष फक्त सेक्सचाच विचार करतात, असा अर्थ या गाण्यातून अभिप्रेत होत आहे. त्यामुळे या गाण्यावर बंदी आणण्यात यावी, अशी या संघटनेची मागणी असून या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ –