राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा: सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । गुवाहाटी 

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने 83व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंधूने पहिल्या फेरीत नागपूरच्या मालविका बनसोडे हिचा 35 मिनिटांच्या लढतीत 21-11, 21-13 असा सरळ गेममध्ये पराभव केला.

गतवर्षीप्रमाणे यावेळीही आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रमवारी मिळून टॉप-8 खेळाडूंना थेट उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला होता. मालविका बनसोडेने लढतीची झकास सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये 4-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र, ब्रेकपर्यंत सिंधूने 11-7 आघाडी घेतली. त्यानंतर तिने पहिला सेट 21-11 असा जिंकला. दुसर्‍या गेममध्ये सिंधूने मालविकाला डोके वर काढण्याची संधी न देता विजयावर शिक्कामोर्तब केले.