सार्वजनिक बांधकाम अभियंत्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

1003

सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) कार्यरत असलेल्या शाखा अभियंत्याला तब्बल अडीच लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज संध्याकाळी चार वाजता रंगेहात पकडले.

विलास तांभाळे असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या शाखा अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय असून त्याठिकाणी विलास शाखा अभियंता आहेत. तक्रारदाराचे काम करुन देण्यासाठी त्यांनी अडीच लाखांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीने आज दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास विलास यांना तक्रारदाराकडून अडीच लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात खळबळ उडाली आहे. राज्यभरात कोरोनाचा कहर सुरु असताना शाखा अभियंत्याने लाच घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या