उरण पंचायत समितीमध्ये शेकापचेच वर्चस्व, सभापती अॅड. सागर कडू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारी झालेल्या उरण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणूकीत सभापतीपदी  शेकापचे  अॅड. सागर कडू तर  शेकापच्याच शुभांगी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तशी घोषणा पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी केली.

उरण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी सोमवारी निवडणूक पार पडली. सभापती आणि उपसभापती पदासाठी शेकाप कडून दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे सभापतीपदी  शेकापचे  अॅड. सागर कडू तर  शेकापच्याच शुभांगी पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी काम पाहिले. याप्रसंगी नायब तहसीलदार संदीप खोमणे, गटविकास अधिकारी निलम गाडे, माजी सभापती नरेश घरत, माजी उपसभापती वैशाली पाटील शासकीय अधिकारी आणि शेकाप कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.  सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीनंतर जल्लोष करण्यात आला.