राधाकृष्ण विखे पाटील यांना मातृशोक

1736

राहता

माजी केंद्रीय मंत्री, पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पत्नी व राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री सिंधुताई विखे पाटील यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्या 85 वर्षाच्या होत्या. प्रवरा ग्रामीण रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी 1 वाजता प्रवरानगर येथील पद्मश्री विखे कारखान्याच्या डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सिंधुताई विखे यांच्या पश्चात जागतिक आरोग्य संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक विखे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे आणि प्रवरा अभिमत विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.राजेंद्र विखे ही तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे. नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या त्या आजी होत. तर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांच्या त्या सासू होत.

आपली प्रतिक्रिया द्या