Photo – हळदी समारंभातील राधिका मर्चंटचा फुलांचा अनोखा दुपट्टा, फोटो पाहून नजर हटणार नाही!

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै 2024 रोजी होणार आहे. याआधी या जोडप्याच्या लग्नाआधीचे सोहळे जोरात सुरू आहेत. संगीत समारंभानंतर सोमवारी हळदी सोहळा साजरा करण्यात आला. या हळदी समारंभातील राधिका मर्चंटचे फोटो समोर आले आहेत. यात तिने कोट्यावधींचे दागदागिने सोडून सुंदर फुलांचे दागिने घातले आहेत. या समारंभासाठी राधिकाने डिझायनर अनामिका खन्ना यांचा पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. यामध्ये राधिकाच्या फुलांच्या दुपट्टा लक्षवेधक ठरला आहे. हा दुपट्टा मोगऱ्याच्या फुलांनी बनवला होता आणि किनाऱ्यावर पिवळ्या झेंडूची फुले होती. त्यावर तिने हलका मेकअप केला होता. या लेहेंग्यावर राधिकाने सुंदर फुलांचे दागिने परिधान केले होते.