पहिले राफेल दसऱ्याला मिळणार, राजनाथ सिंह शस्त्रपूजा करणार

rafale-fighter

हवाई दलाला फ्रान्सकडून मिळणाऱया 36 राफेलपैकी पहिले राफेल दसऱयाच्या मुहूर्तावर हिंदुस्थानला मिळणार आहे. ते घेण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 8 ऑक्टोबरला पॅरीसला जाणार आहेत. या राफेल विमानाची डिलिव्हरी घेताना ते परंपरागत शस्त्र्ापूजाच करतील, असे संरक्षण अधिकाऱयांनी सांगितले.

संरक्षण विभागातील अधिकाऱयांनी सांगितले की, राजनाथ सिंह दरवर्षी दसऱयाला शस्त्र्ापूजा करतात. यंदा ते फ्रान्समध्ये असतील. पण राफेल घेतानाही ते आपली परंपरा कायम ठेवणार आहेत. राफेलच्या करारात महत्त्वाची भूमिका हवाई दलाचे प्रमुख एअरमार्शल आर.बी.एस. भदौरिया यांनी बजावली आहे. त्यांच्या सन्मानार्थ पहिल्या राफेल विमानाला ‘आरबी-01’ असे नाव देण्यात आले आहे.

58 हजार कोटींचा सौदा
हिंदुस्थान आणि फ्रान्स यांच्यात सप्टेंबर 2016मध्ये राफेल या लढावू विमानांच्या देवाणघेवाणीबाबत करार करण्यात आला आहे. हा सौदा 7.8 कोटी युरो म्हणजेच तब्बल 58 हजार कोटींचा असून यात हवाई दलाला 36 अत्याधुनिक लढाऊ विमाने मिळणार आहेत. या विमानांतील एकेका विमानाची किंमत 600 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. हिंदुस्थानच्या पूर्व आणि पश्चिमेकडील सीमा भागात हवाई दलाची ताकद राफेलमुळे आणखी वाढणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या