मोदी सरकार ‘जेपीसी’ चौकशीला का भिते?शिवसेनेचा लोकसभेत सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arvind-sawant

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

‘राफेल’ घोटाळय़ात संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत चौकशी करण्यास मोदी सरकार का भीत आहे, असा सवाल शिवसेनेने आज लोकसभेत विचारला. ‘एचएएल’ची कामगिरी चांगली आहे. ‘एचएएल’ ही हिंदुस्थानची सरकारी कंपनी राफेल विमान आपल्या देशातच बनवू शकते, असे त्या कंपनीच्या माजी चीफ मॅनेजिंग डायरेक्टरनी म्हटले होते. मग राफेलचे कंत्राट ‘एचएएल’ला का नाकारण्यात आले, असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेतील चर्चेवेळी उपस्थित केला. ‘राफेल’ प्रकरणात ऑफसेट पार्टनर असा कसा होता की ज्याची कंपनी केवळ कागदोपत्रीच होती, तर ‘एचएएल’कडे सारे काही होते. आमचे सरकार जर ‘स्वच्छ’ असेल तर आम्हाला ‘जेपीसी’कडून चौकशी होण्याचे डर कशाला हवे, असा सवाल त्यांनी केला.