
प्रेमाला वयाचे बंधन नसते याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात असेच एक ताजे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले आहे. एक 50 वर्षांचा गायक 16 वर्षांनी लहान असलेल्या गायिकेच्या प्रेमात पडला आहे. लवकरच ते दोघं लग्नबंघनात अडकणार आहेत.
फोक फ्युजनचा बादशाह आणि द रघु दिक्षित प्रोजेक्टचा गायक रघु दीक्षित वयाच्या 50 व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. त्यांची होणारी पत्नी सुप्रसिद्ध गायिका आहे. ती त्यांच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. रघु दीक्षित ग्रॅमी नॉमिनेटेड गायिका आणि बासरीवादक वरिजाश्री वेणुगोपाल हिच्याशी लग्नबंधनात अडकणार आहे.
रघु दीक्षित या संगीतकाराने 2005 मध्ये कोरिओग्राफर, नृत्यांगना मयुरी उपाध्यायबरोबर लग्न केले होते. मात्र 2019मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांची ‘म्हैसूर से आयी’ आणि ‘हे भगवान’ गाणी प्रसिद्ध आहेत. रघु दीक्षित यांनी या वृत्ताला दुजोरा देत या महिन्याच्या अखेरीस लग्न करणार असल्याचे सांगितले.