
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले, जे प्रत्येक व्यक्तीला एक मताचे अधिकार देतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा निवडणूक आयोगाच्या संगनमताने मतांची चोरी करत आहेत, जो संविधानावर हल्ला आहे”, असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. बिहारमधील वझीरगंज येथे निवडणूक सभेत संबोधित करता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “मोदी आणि शहा बिहारमध्येही मते चोरण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपण त्यांना असे करण्यापासून रोखले पाहिजे. आपण खंबीरपणे उभे राहून संविधानाचे रक्षण केले पाहिजे” ते म्हणाले, “नरेंद्र मोदी यांनी मतचोरी करून जंगलराज लादला आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि छत्तीसगडची सरकारे चोरल्यानंतर, भाजप आता बिहारचे सरकार चोरू इच्छित आहे.”
राहुल गांधी म्हणाले, “बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. हे महाआघाडीचे सरकार प्रत्येक वर्गाचे, प्रत्येक जातीचे आणि प्रत्येक धर्माचे प्रतिनिधित्व करेल. या सरकारमध्ये महिला, शेतकरी, कामगार आणि तरुणांसह संपूर्ण बिहारच्या लोकांचा आवाज असेल.”
            
		





































    
    























