Photo – शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नात राहुल गांधी वऱ्हाडी! पुरी-भाजी, गुलाबजाम, लाडूचा आस्वाद घेतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी हरयाणाच्या सोनिपत जिल्ह्यातील मदिना गावाला भेट दिली.

राहुल गांधी यांनी मदिना येथील एका शेतकरी कुटुंबातील विवाह सोहळ्याला हजेरी लावली.

मंगळवारी सकाळी राहुल गांधी मदिना गावामध्ये पोहोचले. 

राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी रोहतकचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासह काँग्रेसचे अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.

मदिना गावातील संजय नावाच्या शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी राहुल गांधी येथे पोहोचले होते.

यावेळी राहुल गांधी यांनी घरातील सदस्यांची आपुलकीने विचारपूस करत त्यांच्यासोबत पुरी-भाजी, लाडू, गुलाबजाम याचाही आस्वास घेतला.


संजय यांच्याच शेतामध्ये राहुल गांधी यांनी 2023 मध्ये ट्रॅक्टर चालवला होता आणि शेतपिकाची लावणीही केली होती.