आरएसएसचे पंतप्रधान ‘भारत माते’शी खोटे बोलतात –  राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. गुरुवारी राहुल गांधी यांनी ट्वीट करून पंतप्रधान मोदी खोटारडे असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी आसाममधील डिटेंशन सेंटरशी संबंधित एक व्हिडिओ ट्वीट करुन लिहिले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान भारत मातेशी खोटं बोलतात.’

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटसोबत #JhootJhootJhoot असा हॅशटॅग वापरला आहे. त्यांनी ट्वीट केलेला व्हिडीओ हा आसाममध्ये उभारण्यात आलेल्या डेटेन्शन सेंटरचा आहे. ज्यात पंतप्रधान मोदींचे ते भाषण आहे ज्यात ते म्हणत आहे की, ‘देशात एक ही डिटेंशन सेंटर नाही.’ दिल्लीतील रामलीला मैदानात झालेल्या सभेत ते असे म्हणाले होते.

या सभेमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘आताही जे लोक गोंधळात आहेत मला त्यांना सांगायचं आहे की, काँग्रेस आणि शहरी नक्षलवाद्यांनी पसरवलेल्या डिटेंशन सेंटरच्या अफवा खोट्या, लबाडीच्या आणि देशाला विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. या अफवा खोट्या, खोट्या आणि खोट्या आहेत’, असं मोदी म्हणाले होते.