देशात संपूर्ण लॉकडाऊनची गरज, अन्यथा नागरिकांच्या जिवाला धोका – राहुल गांधी

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा पर्यात स्विकारला आहे. अशा वेळी काँग्रेस नेते यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन लावावा अशी मागणी केली आहे. तसेच असे न केल्यास नागरिकांच्या जिवाला धोका आहे अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या 24 तासांत देशात साडे तीन लाखहून अधिक रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या दोन कोटींच्या वर गेली आहे. अशा वेळी राहुल गांधी यांनी इशारा दिला आहे.

गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता एकमेव उपाय आहे तो म्हणजे संपूर्ण लॉकडाऊन. सरकारला हे अजिबात कळत नाही. लॉकडाऊन लावून न्याय योजना लागू करावी अशी मागणी करत सरकार सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा घणाघात केला आहे.

काँग्रेसने लोकसभा निवडणूकीपूर्वी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यात काँग्रेस सत्तेत आल्यास न्याय योजना लागू केली जाईल असे आश्वासन दिले होते. न्याय योजनेनुसार गरीब आणि गरजुंच्या बँकेत थेट रक्कम करण्याची तरतूद होती. काँग्रेसन ही योजना छत्तीसगडमध्ये राबवली आहे. ही योजना देशात लागू करावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या