
1.राहुल गांधी यांनी बुधवारी हरयाणातील जझ्झरमधील विरेंद्र आर्य यांच्या आखाड्याला भेट दिली.

2.राहुल गांधी यांनी पैलवानांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

3.कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला पैलवानांनी गंभीर आरोप केले होते आणि आंदोलनही केले होते.

4.पैलवानांना न्यायासाठी रस्त्यावर संघर्ष करावा लागला तर कोण आई-बाप हा मार्ग निवडण्यासाठी मुलांना प्रोत्साहीत करतील असा सवाल राहुल यांनी विचारला आहे.

5.शेतकरी कुटुंबातील या तरुणांना तिरंग्याची सेवा करण्याची संधी दिली तर हे खेळाडू देशाचे नाव उंचावतील असे राहुल यांनी म्हटले.




























































