गरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे टीकास्त्र

केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून उद्योेगपतींच्या फायद्याचे निर्णय घेतले जात आहेत. कृषी विधेयकापाठोपाठ कामगार कायद्यात मनमानी पद्धतीने बदल करून केवळ उद्योजकांचे हित जोपासणाNया मोदी सरकारच्या धोरणाबद्दल कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

कृषी कायद्याप्रमाणेच कामगार कायद्यातील बदलांनाही विविध कामगार संघटना तसेच राज्य सरकारांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या पाश्र्वभूमीवर मोदी सरकारनं कामगार कायद्यात केलेल्या दुरुस्तीसंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करून टीका केली आहे. शेतकNयांनंतर कामगारांवर वार. गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण, हेच आहे मोदीजींचं शासन,’ अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

संसदेने तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयके मंजूर केली आहेत. यानुसार कंपनी बंद करण्याच्या मार्गातील अडथळे दूर होतील. कामगारांची भरती वा कपात, कामाचे तास, कामगारांचा संप, कामगारांचा नोकरीचा कार्यकाळ अशा कळीच्या मुद्द्यांवर लवचीकता दाखवता येणार आहे. मात्र या संहितांमुळे कामगार संघटनांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या