
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून त्यांना शुभेच्छा दिल्या.
जन्मदिन की हार्दिक शुभेच्छा @OfficeofUT जी।
आप स्वस्थ रहें, खुश रहें – महाराष्ट्र के हित और हर देशवासी को न्याय दिलाने की लड़ाई में हम एकजुट हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 27, 2026
”उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही कायम स्वस्थ आणि आनंदी रहा. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि जनतेला न्याय मिळवून देण्याच्या लढाईत आपण एकजूट आहोत”, असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.
देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव
उद्धव ठाकरे यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशभरातील मान्यवरांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त एक्स पोस्टच्या माध्यमातून तसेच फोन करून शुभेच्छा दिल्या. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, @ShivSenaUBT_ पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे (@uddhavthackeray) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!@OfficeofUT#FilePhoto pic.twitter.com/JoBAQSeqWg
— Supriya Sule (@supriya_sule) July 27, 2026
Birthday greetings to @ShivSenaUBT_ President Thiru. Uddhav Thackeray.
The extraordinary show of support at Shivaji Park yesterday was a resounding reminder that every attempt to weaken you has only strengthened the people’s resolve to stand by you.
Wishing you good health and… pic.twitter.com/QbqQ6e3gXV
— M.K.Stalin (@mkstalin) July 27, 2026


























































