अजहरसोबत डोवाल विमानात नव्हतेच! सुरक्षा यंत्रणांनी आरोप फेटाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-doval

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वाजपेयी सरकारच्या काळात 1999 साली झालेल्या कंदहार विमान अपहरण प्रकरणात विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल नव्हते, असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. त्यामुळे अपहरण करण्यात आलेल्या विमानात डोवाल होते, हा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप चुकीचा असल्याचे समोर आले आहे.

दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून कंदहारला नेले होते. प्रवाशांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारला डिसेंबर 1999 मध्ये मसूद अजहरची सुटका करावी लागली. त्यावेळी अजित डोवाल गुप्तचर खात्याचे अतिरिक्त संचालक होते. मसूदच्या सुटकेआधीच आयएसआय नियंत्रित अपहरणकर्ते आणि तालिबानी दहशतवाद्यांशी चर्चा करण्यासाठी डोवाल हे कंदहारला गेले होते. त्यावेळी तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह हे मसूद अझहर, ओमर शेख आणि मुश्ताक झारगर या दहशतवाद्यांना घेऊन कंदहारला गेले होते.

जैशच्या तळावर होते 263 दहशतवादी

पाकिस्तानच्या बालकोटमधील जैश ए मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राईक करण्याच्या पाच दिवस आधी तिथे 263 दहशतवादी होते, असे वृत्त एका इंग्रजी वाहिनीने दिले आहे. हिंदुस्थानने 26 फेब्रुवारीला एअर स्ट्राईक केला. जैशमध्ये भरती होण्यासाठी आलेले हे सर्व दहशतवादी आणि त्यांच्या ट्रेनर्सकडे असलेले मोबाईल फोन ऍक्टिव्ह होते. हिंदुस्थानच्या नॅशनल टेक्निकल रीसर्च संस्थेकडून (एनटीआरवो) ने सगळय़ा मोबाईलवर बारीक लक्ष ठेवले होते.