शूटींगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला ब्रेन स्ट्रोक, नानावटी रुग्णालयात आयसीयूत दाखल

प्रसिद्ध अभिनेता व बिग बॉसच्या पहिल्या सिझनचा विजेता राहुल रॉय याला चित्रपटाचे शूटींग सुरू असताना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. कारगिल येथे हे शूटींग सुरू होते. त्यानंतर राहुल रॉयला तत्काळ मुंबईला हलविण्यात आले असून त्याच्यावर पार्ल्यातील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

rahul-roy-1

राहुल रॉय हा एलएसी – लिव्ह द बॅटल या त्याच्या आगामी चित्रपटाचे कारगिलमध्ये शूटींग करत होता. कारगिलमध्ये सध्या हाडं गोठविणारी थंडी आहे. त्या वातावरणामुळेच राहुलला हा त्रास झाल्याचे बोलेल जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या