
रायगड जिल्ह्यातील उरण येथील जीटीपीएस प्लांटमध्ये एचपीबीसीपी (बॉयलर) चा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये तीन कर्मचारी जखमी झाली असून तिघांनाही उपचारासाठी नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रविवारी दुपारच्या सुमारास जीटीपीएस प्लांटमध्ये स्फोट झाला. बॉयलरच्या स्फोटाच्या कचाट्यात आल्याने विष्णू पाटील, कुंदन पाटील आणि इंजिनिअर विवेक धुमाळे हे तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. तिघांनाही नवी मुंबईतील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.
View this post on Instagram
































































