रेल्वेकडून सर्वसामान्यांना दिलासा, या रेल्वे तिकीटाच्या दरात केली मोठी घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. तसेच खाद्य तेलाच्या किंमतीही कमी केल्या होत्या. आता रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कमी केले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत 50 रुपये इतकी होती. आता हे तिकीट 10 रुपयांना मिळणार आहे. कोरोना काळात स्थानकांवर गर्दी कमी होण्यासाठी रेल्वेने या तिकिटांची किंमत वाढवली होती, आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर ही दरवाढ मागे घेण्यात आली आहे.


आता UTS वरून काढा तिकीट किंवा मासिक पास
रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य सरकारने UTS मोबाईल ॲप आणि युनिव्हर्सल ॲप पास पोर्टल लिंक केले आहे. त्यामुळे प्रवाशांची तिकिट रांगेतून सुटका झाली असून आता प्रवाशांना UTS ॲपवरून तिकीट आणि पास काढता येणार आहे. आता तिकीट किंवा पास काढण्यासाठी प्रवाशांना तिकीट खिडकीवर जाण्याची गरज नाही. बुधवारपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.