नाशिक घोटी त्र्यंबकेश्वरला पावसाचे दमदार आगमन, भावली धरण 100 टक्के भरले

901

जुलै महिना पूर्णपणे पावसाने ओढ दिल्याने नाशिक भागात पावसाळा कोरडा गेला.   मात्र 12 व 13 ऑगस्ट रोजी पावसाचे कमबॅक झाल्याने, घोटी त्र्यंबकेश्वरला जोरदार पाऊस पडला. गोदावरी नदीला तिसऱ्यांदा दारणा धरण समूहातून नांदूर मधमेश्वर बंधारा 16 हजार 864 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदी एकूण 59 दिवसांच्या विश्रांतीनंतर तिसऱ्यांदा वाहती  झाली आहे.

यापूर्वी 4  व 14 जून रोजी पाणी सोडण्यात आले होते. गोदावरी खोऱ्यातून यंदाच्या हंगामात जायकवाडीला चांगले पाणी गेल्याने समन्यायी पाणीवाटपाचा फटका चालूवर्षी बसणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडी करण्याकडे भर दिला आहे. भावली धरण पूर्णपणे तर दारणा 92 टक्के भरले आहे.

गोदावरी नदीला 4 जून रोजी 16 हजार 220 क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. नदीचे पाणी पाहण्यासाठी सामाजिक अंतर ठेवत नागरिकांनी काही प्रमाणात गर्दी केली होती. गंगापूर धरण समूहावर सिंचन अवलंबून असून यांना पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण होते. मात्र पावसाने दमदार कमबॅक केलं आणि शेतकऱ्यांचे चेहचे आनंदाने प्रफुल्लीत झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या