उत्तर हिंदुस्थानींमुळेच मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडते, राज ठाकरे यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महाराष्ट्राची लोकसंख्या 13.5 कोटी आहे. त्यातच उत्तर हिंदुस्थानातून दररोज 48 गाड्या महाराष्ट्रात येतात.उत्तर हिंदुस्थातून दिवसेंदिवस वाढणाऱया लोंढय़ांमुळेच मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. कांदिवली येथे आयोजित उत्तर भारतीय महापंचायत समितीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आजवर जे पंतप्रधान झाले त्यापैकी 70 ते 80 टक्के उत्तर प्रदेश, बिहारमधील होते. असे असतानाही तिथल्या लोकांना रोजगारासाठी इतर राज्यांत वणवण भटकावे लागतेय, तिथे जाऊन अपमान सहन करावा लागतोय. उत्तर प्रदेशातील बेरोजगारीला सर्वस्वी तिथले नेते जबाबदार आहेत. त्याबाबत तुमच्या नेत्यांना जाब विचारा, असे राज ठाकरे म्हणाले. आपण ज्या राज्यात जातो तेथील भाषा, संस्कृतीचा सन्मान राखायला हवा. राज्यातील मराठी तरुण-तरुणींना नोकरीत प्राथमिकता मिळायला हवी, अशी आपली भूमिका असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.