लॉकडाऊनमध्ये लिहिलं 2100 पानांचं रामायण! राजस्थानमधील भावंडांची कौतुकास्पद कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमध्ये चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण बंद असल्याने दूरदर्शनवर जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा प्रसारितझाल्या. यात सर्वाधिक क्रेझ होती ती रामायण, महाभारत या पौराणिक मालिकेची. मात्र राजस्थानमधील दोन भावंडांनी केवळ या मालिका न पाहता चक्क 2100 पानांचे रामायणचं लिहून काढले आहे.

राजस्थानातील जालौरच्या आदर्श विद्यामंदिर शाळेत चौथीत शिकणाऱया माधव जोशी आणि तिसरीत शिकणाऱया अर्चनाजोशी या भावंडांनी लॉकडाऊनमध्ये ही काwतुकास्पद कामगिरी केली आहे. माधव आणि अर्चनाने कागदावर पेनाच्या सहाय्याने सात भागांमध्ये रामायण लिहिले आहे. श्रीरामचरित्रमानस सात भागांमध्ये आहे. यात बाल्यावस्था, अयोध्या, अरण्या, किष्किंधा, सुंदर, लंका आणि उत्तर रामायण यांचा समावेश आहे. दूरदर्शनवरील रामायण पाहून रामायण वाचण्याची इच्छा आणखी वाढल्याचे माधव याने सांगितले.