‘मी टू’ मोहिमेचे पडसाद,अखेर रजत कपूरने माफी मागितली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

अभिनेता-निर्माता रजत कपूर याने लैंगिक गैरवर्तणूक केल्याचा आरोप महिला पत्रकाराने नुकताच केला. त्यानंतर रजत कपूरने माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकायचा आज प्रयत्न केला.‘मी टू’ या मोहिमेंतर्गत अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. अभिनेते नाना पाटेकर, लेखक चेतन भगत, निर्माते विकास बहल, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर महिलांनी गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता रजत कपूर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रजतची मुलाखत घेण्यासाठी गेले असता आपल्यासोबत लैंगिक गैरवर्तणूक झाल्याचे ‘मी टू’ मोहिमेत महिला पत्रकाराने सांगितले. यावर रजतने लगेचच ट्विटरवर जाहीर माफी मागितली आहे. मी आयुष्यभर एका सभ्य पुरुषासारखे जगण्याचा प्रयत्न केला. जे योग्य तेच मी करीत होतो. माझ्या कृतीतून आणि शब्दांतून काही जण दुखावले, माझ्यामुळे कुणाला तरी खूप दुःख झाले याचे मला खूप वाईट वाटत आहे. मी त्यासाठी सगळ्यांची माफी मागतो. कामापेक्षा चांगली व्यक्ती होणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असते. या क्षणापासून मी अधिक चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न करेन, असे ट्विट रजतने केले आहे.

रजतच्या आधी लेखक चेतन भगत यानेही माफी मागितली आहे.  एका महिलेने चेतन भगत यांच्याकर आपल्याला त्रास दिल्याचा आरोप करीत दोघांमध्ये झालेल्या क्हॉट्सऍपकरील चर्चेचे स्क्रीनशॉटस् सोशल मीडियाकर पोस्ट केले. त्यानंतर याकर प्रतिक्रिया देताना  भगत यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे या  महिलेची माफी मागितली आहे. या स्क्रीनशॉटचा उल्लेख करीत भगत यांनी आपली चूक मान्य केली आहे.

एआयबी शोमधून तन्मय भट बाहेर

द एआयबीचा लोकप्रिय विनोदवीर आणि सीईओ तन्मय भट आता शोमधून बाहेर पडला आहे. तन्मयसोबत गुरसिमरन खंबा हादेखील शोमध्ये नसेल. ‘मी टू’ मोहिमेत एआयबीचा सदस्य उत्सव चक्रवर्ती याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप आला होता. चक्रवर्तीने काय केले याची माहिती तन्मयला होती, असे समजले होते. त्यानंतर सोशल मीडियावर एआयबीवर सातत्याने ट्रोलिंग झाले. अखेर आज एआयबीने पत्रक जारी करून तन्मयला हटवल्याची माहिती दिली. रोजच्या कामकाजात यापुढे तन्मयचा काहीच हिस्सा नसेल असे एआयबीने स्पष्ट केले.