
राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेले राजेश अग्रवाल यांनी आज मावळते मुख्य सचिव राजेशकुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला.
मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात विविध विभागांचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव आणि अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचा विकास आणि गौरव वाढवण्यासाठी प्रभावीपणे कार्यरत राहीन, असे पदभार स्वीकारल्यानंतर अगरवाल म्हणाले.
राजेश अग्रवाल हे देशाच्या प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र पॅडरचे 1989 चे अधिकारी असून त्यांचे मूळ गाव पंजाबमधील जालंधर हे आहे. त्यांनी कॉम्प्युटर सिस्टम विषयामध्ये बी. टेक. केले आहे.


























































