लस कधी येईल याची शाश्वती नाही, गाफील राहून चालणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला पूर्ण हरवायचं आहे, हा आपला उद्देश आहे. कोरोनाची लस कधी येईल याची शाश्वती देऊ शकत नाही. पण लस आली तरी गाफिल राहून चालणार नाही, असे आवाहन आपल्याकडे लॉकडाऊनची वेळ येईल असं वाटत नाही. पण जर मोठय़ा प्रमाणात रुग्ण वाढले आणि कोरोना साखळी तोडण्याची गरज निर्माण झाली तर लॉकडाऊन करावा लागेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. कोरोनाची लस लवकर यावी अशी अपेक्षा आहे. लस कधी येईल याची शाश्वती देऊ शकत नाही, पण कोरोना लस वितरित करण्याची पूर्वतयारी सरकारकडून सुरू आहे. डेटा बनवण्याचं काम सुरू आहे. मात्र लस आली तरी गाफिल राहून चालणार नाही. लसीकरणासाठी प्राधान्य हे फ्रण्ट लाईनवर असलेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना दिली जाईल. त्यानंतर 50 वर्षांवरील लोकांना ही लस दिली जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

z 17 हजार रिक्त जागा भरणार
फोर एम तत्त्वांनी काम करणार आहोत. पैशांची अडचण आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेत चार हजार चारशे कोटी रुपयांचा सॉफ्ट लोनचा प्रस्ताव दिला आहे. त्यामधून उपकरणांची, बांधकामांची कमतरता भरून काढणार आहोत. पब्लिक, प्रायव्हेट पार्टनरशिप या पीपीपी मॉडेलवर भर देणार आहोत. आशा वर्पर्सचा पगारवाढ केला आहे. 17 हजार रिक्त जागा भरणार आहोत. औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून नवी मंडळांची स्थापना करणार आहोत. त्याचप्रमाणे शहरी भागातील मानसिक आरोग्यावर लक्ष देणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.