रजनीकांत- कमल हासन 35 वर्षांनंतर येणार एकत्र

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दोन मेगास्टार रजनीकांत आणि कमल हासन पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गिरफ्तार’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. तेव्हापासून चाहते या दोन मेगास्टार अभिनेत्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर 35 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक लोकेश कानगराज यांच्या आगामी चित्रपटात रजनीकांत व कमल हासन पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.

लोकेश कानगराज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या आगामी चित्रपटाची घोषणा केली, मात्र त्यांनी या चित्रपटाचे नाव, कथानक किंका रजनीकांत व कमल हासन यांच्या भूमिकांबाबत कुठल्याही स्करूपाची माहिती दिली नाही. ‘मी रजनीकांत व कमल यांना चित्रपटाचे कथानक काचायला पाठकले होते. दोघांनाही कथानक खूप आकडले आहे.

35 वर्षांनंतर दोघे एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहेत. येत्या काळात मी चित्रपटाची अधिकृत घोषणा करेन’ असे लोकेश कानगराज म्हणाले. सध्या कमल हासन ‘इंडियन-2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे रजनीकांतदेखील ‘दरबार’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ‘दरबार’ येत्या 15 जानेवारी 2020मध्ये प्रदर्शित होईल.

आपली प्रतिक्रिया द्या