काँग्रेस नेते राजीव सातव व्हेंटिलेटरवर; प्रकृती स्थिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे महासचिव आणि गुजरात प्रभारी राजीव सातव यांना व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. अगदीच गरज लागली तर त्यांना मुंबईला हलवले जाईल, असे राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते डॉ. विश्वजित कदम यांनी पत्रकारांना सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी हे गेल्या दोन दिवसांपासून राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपचारासाठी आवश्यक ती मदत करू असे सांगितले असल्याची माहिती कदम यांनी दिली. दिल्ली आणि मुंबईतील वैद्यकीय तज्ञांशी सल्लामसलत करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी आज जहांगीर हॉस्पिटलला भेट दिली.