केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजनाथ सिंह यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून सौम्य स्वरुपाची लक्षणे आहेत. सध्या होम क्वारंटाईनमध्ये असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला आयसोलेट करावे आणि कोरोना चाचणी करून घ्यावी, असे ट्विट राजनाथ सिंह यांनी केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रामध्येही अनेक मंत्र्यांना आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच काही आमदारांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते, तर 10 हून अधिक मंत्रीही कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.