राजस्थान सीमेवर पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा

476

सीमा सुरक्षा बलाने (बीएसएफ) शनिवारी मध्यरात्री पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या झाडून ठार केले. हा घुसखोर राजस्थानच्या बारमेर जिह्यालगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून हिंदुस्थानात घुसखोरी करीत होता. बीएसएफच्या पथकाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कुंपण ओलांडून दुसऱया बाजूने पळ काढताच जवानांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. नंतर झुडपात त्याचा मृतदेह सापडला.

बारमेर जिल्ह्यातील बखसर परिसरात शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. घुसखोराचा गोळीबारात खात्मा केल्यानंतर बीएसएफच्या जवानांना पाकिस्तानच्या दिशेने 10 ते 15 बॅटऱ्यांचे प्रकाशझोत दिसले तसेच जोरजोरात ओरडल्याचा आवाजही ऐकू आला. या परिसरात पहिल्यांदाच रात्रीच्या सुमारास घुसखोरीचा प्रयत्न झाला. याआधी पाकिस्तानी घुसखोरांनी दिवसा हिंदुस्थानच्या हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला होता. बीएसएफने त्यांचे मनसुबे वेळीच उधळून लावले होते.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ऍलर्ट
हिंदुस्थानचा स्वातंत्र्य दिन सोहळा काही दिवसांकर येऊन ठेपल्याने पाकिस्तानने सीमेवर कुरापती सुरू केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय सीमेच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विशेष खबरदारी बाळगण्याचा (हाय ऍलर्ट) इशारा बीएसएफला देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या