महाविकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडत असल्याचे जाहीर केले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होताना संघटना या आघाडीत सहभागी झाली. सरकार स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षात अनेकदा मागणी करूनही संघटनेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून न घेतल्याने शेट्टी यांच्यासह संघटनेचे सर्वच नेते नाराज होते. त्यामुळे मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.