जाहिरातबाजीत मिंधे सरकार बिझी, राजू शेट्टी यांची टीका

राज्यातील मिंधे सरकार केवळ राजकारण आणि जाहिरातबाजी करण्यात व्यस्त आहे, शेतकऱयांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज येथे केला. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे तरीही सरकार हातपाय हलवायला तयार नाही. केवळ दोन-चार हजार रुपये देऊन शेतकरी उभा राहणार नाही, असे शेट्टी म्हणाले.