सतीश पुळेकर, आप्पा वढावकर यांना राज्य पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, संगीत संयोजक आप्पा वढावकर यांच्यासह 12 जणांना आज राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आला. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्य सरकारने आज या पुरस्कारांची घोषणा केली. कंठसंगीत गायन कमल भोंडे, उपशास्त्राrय संगीत मंगलाताई जोशी, चित्रपट (मराठी) मनोहर आचरेकर, कीर्तन तारा देशपांडे, शाहीर अंबादास तावरे, नृत्य मोहिनीअट्टम नृत्यांगना रत्नम जनार्दनम, आदिवासी गिरीजन नीळकंठ ऊईके, कलादान सतीश कांबळे, तमाशा हसन शेख, लोककला लताबाई सुरवसे यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.