अस्थानांविरोधात लाचखोरीचे ठोस पुरावे!

148
rakesh-asthana
फाईल फोटो

सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांना लाचखोरी प्रकरणात देण्यात आलेल्या ‘क्लीन चिट’वरून शुक्रवारी सीबीआयचे आजी-माजी तपास अधिकारी दिल्लीच्या विशेष न्यायालयात समोरासमोर उभे ठाकले. अस्थाना यांच्याविरोधात ठोस पुरावे आहेत. मात्र सध्याचे तपास अधिकारी सतीश डागर हे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताहेत, असा दावा माजी तपास अधिकारी अजय कुमार बस्सी यांनी केला. दोन वर्षांपूर्वीच्या लाचखोरी प्रकरणात दिल्लीच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्या आरोपपत्रासंबंधी शुक्रवारी सीबीआयचे विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांच्यापुढे सुनावणी झाली.

आपली प्रतिक्रिया द्या