
‘जर आज महात्मा गांधी असते तर त्यांनी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला असता’, असे वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी केले आहे. यावेळी त्यांनी गांधीजींच्या नावाचा वापर करणारे लोक आता त्यांच्या विचारांच्या अगदी विरोधात वागत असल्याची टीका देखील केली. महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
‘महात्मा गांधी यांच्या नावाचा व त्यांच्या फोटोचा वापर करून जे राजकारण करत आहेत ते आज त्यांच्या विचारांच्या विरोधात वागत आहेत. त्या उलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघच गांधीजींच्या विचाराचे पालन करतो. त्यामुळे जर आज गांधीजी असते तर त्यांनी संघात प्रवेश केला असता’, असे सिन्हा यांनी सांगितले.
























































