
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिने जॅकी भगनानी आणि तिच्या नात्याबद्दल एक गोष्ट शेअर केली आहे. रकुलने सांगितली की, ती फक्त 4 तासांच्या डेटसाठी थेट लंडनला गेली होती. चित्रपट ‘पति पत्नी और वो दो’च्या प्रमोशनदरम्यान रकुलने सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली आणि त्यानंतर त्यांचे नाते प्रेमात बदलले. रकुलच्या मते, नातं टिकवण्यासाठी पार्टनर हा सर्वात चांगला मित्र असणं खूप महत्त्वाचं आहे.
रकुलने सांगितले की, डेटिंगच्या सुरुवातीच्या काळात जॅकी लंडनमध्ये होता. त्यावेळी ती ‘डाॅक्टर जी’ चित्रपटाचे शूटिंग करत होती आणि तिला तीन दिवसांचा ब्रेक मिळाला होता. त्या ब्रेकमध्ये ती सकाळी लंडनला पोहोचली आणि रात्री भारतात परतण्यासाठी फ्लाइट होती. त्यामुळे दोघांकडे फक्त 4 तास एकत्र घालवण्यासाठी होते. “मला फक्त त्याला भेटायचं होतं,” असे रकुलने म्हटले. असे वृत्त आज तक ने दिले आहे. रकुल आणि जॅकी या दोघांनी 2021 मध्ये आपले नाते सार्वजनिक केले होते आणि फेब्रुवारी 2024 मध्ये गोव्यात पारंपरिक पद्धतीने लग्न केले.
लग्नानंतर आयुष्यात काय बदलले, यावर बोलताना रकुलने सांगितले की, दोघांनी आपापल्या स्लीप शेड्यूलमध्ये बदल केला. पूर्वी जॅकी उशिरा झोपत असे, तर रकुल लवकर झोपायची. आता दोघांनी मधला मार्ग काढत रात्री 11 वाजता झोपण्याची सवय लावली आहे.
























































