2022 पर्यंत राम मंदिर होऊ शकतं पूर्ण, सुत्रांची माहिती

1286

अयोध्येत राम मंदिराचे काम पुढील वर्षी एप्रिल मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच 2022 पर्यंत या मंदिराचे काम पूर्ण होऊ शकतं अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर राम मंदिराच्या ट्रस्टची स्थापना होऊ शकते यावर विचार सुरू आहे.  हे ट्रस्ट मंदिराच्या कामावार देखरेख ठेवू शकतं.

एएनआय या वृत्तसंस्थेने याबात माहिती दिली आहे. 9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त अयोध्या खटल्यावर निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायलायाने 2.77 एकर जमीन रामलला देण्याचे व मंदिर बनवण्यासाठी एक विश्वस्त स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.

सोमनाथ मंदिराच्या विश्वस्तामध्ये सहा सदस्य आहेत. तर राम मंदिराच्या विश्वस्त सदस्यांची संख्या 14 ते 17 असू शकते. रामजन्मभूमी न्यासालाच विश्वस्त नेमून त्यात नवीन सदस्यांना सामील करण्यावर केंद्र सरकार विचार करत आहेत. याच विश्वस्तावर मंदिर बनवण्याची जवाबदारी द्यावी की नाही यावरही विचारविमर्श सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद मोदी विश्वस्त सदस्यांबाबत निर्णय घेतील. विश्वस्त सदस्यांमध्ये विहिंप आणि बजरंग दलच्या नेत्यांनाही समाविष्ट करण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या