राम मंदिरच्या विश्वस्तांनी पंतप्रधान मोदींची निवासस्थानी घेतली भेट

483

राम मंदिर विश्वस्ताचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास आणि विश्वस्तांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. नुकतीच राम मंदिराच्या विश्वस्ताची स्थापना होऊन त्यांची बुधवारी बैठक पार पडली.

बैठकीनंतर अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी पंतप्रधान मोदींना अयोध्येला येण्यास निमंत्रण दिले. माजी नोकरशहा नृपेंद्र मिश्रा यांच्याकडे भवन निर्माण समितीचे संचालक पद तर स्वामी गोविंददेव गिरी यांच्याकडे कोषाध्यक्षपद एण्यात आले. तसेच अयोध्येत भारतीय स्टेट बँकेत खाते उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंदिर बनवण्याचे काम कधी सुरू होणार यावर स्वामी गोविंददेव गिरी म्हणाएल की नृपेंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. ही समिती तज्ज आणि इतर लोकांशी चर्चा करेल आणि मंदिराचे बांधका कधी सुरू केले जाईल याची तारीख ठरवतील.

आपली प्रतिक्रिया द्या