बाबासाहेबांच्या सविधांनाला हात लाऊन देणार नाही- रामदास आठवले

370

केंद्रामध्ये मोदी सरकार चांगल्याप्रकारे काम करत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले भाजप व शिवसेनेविषयी मुस्लीम आणि दलितांना खोटे सांगून त्यांच्या मनात द्वेष निर्माण करत असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला. मोदी सरकार बाबासाहेबांचे सविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार राष्ट्रवादी, काँग्रेसवाले करत असून मी जोपर्यंत मोदींच्या मंत्रिमंडळात आहे, तो पर्यंत बाबासाहेबांच्या सविधांनाला हात लाऊन देणार नसल्याचे वक्तव्य आठवले यांनी म्हसळा येथील सभेत केले.

श्रीवर्धन मतदार संघातील शिवसेना भाजप आरपीआय युतीचे उमेदवार डॉ.विनोद घोसाळकर यांच्या प्रचारार्थ म्हसळा येथे शुक्रवारी आठवले यांच्या उपस्थितीत सभा झाली. शिवसेना हा पक्ष मुस्लिम विरोधी नसून राष्ट्रवादी मुस्लिमांच्या केसाला शिवसेना धक्काही लागू देणार नाही. माझ्या खात्यातंर्गत येणारा विकास निधी मी घोसाळकर यांना देऊ इच्छितो. घोसाळकर हे एक चांगले मित्र व कार्यकर्ते आहेत. मतदार संघातील शेतकरी, माछिमार, बेरोजगार तरुण व महिला बचत गटांचे सर्व प्रश्न सोडवण्याची कुवत घोसाळकरांमध्ये आहे, घोसाळकर मंत्री व्हावेत हीच माझी इछा असून संपूर्ण दलित समाजाचे मतदान त्यांना मिळतील अशी आशा आठवले यांनी सभेत जाहीर केली.

डॉ.विनोद घोसाळकर यांनी आपल्या भाषणात मी या मतदार संघाचा आमदार नक्कीच होणार आहे. ज्या वेळी आमदार म्हणून काम करत असेन त्या वेळी दलित वस्तीमध्ये विकासाला चालना देणार. मी या भागातला भूमिपुत्र असून कोणताही पाहुणा नाही असे संगितले. तटकरे यांनी अनेक मंत्री पदे भूषवली असताना म्हसळा शहरातील नळ पाणी पुरवठा योजना तीन वेळा भूमिपूजन करून देखील का अपूर्ण आहे, म्हसळा शहरातील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर का नाहीत असे सवालही त्यांनी केले.

यावेळी युतीचे उमेदवार डॉ. विनोद घोसाळकर, माजी आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवड, भाजपचे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, प्रमोद घोसाळकर, भाऊ करडे, तालुक प्रमुख महादेव पाटील, आरपी.आय तालुका अध्यक्ष राजेश तांबे, महिला आघाडीच्या रीमा महामुनकर, माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के, माजी सभापती रविंद्र लाड, शहर प्रमुख मुन्ना भाई पानसरे यांच्यासहित शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या