वैचारिक दहशतवाद देशहिताला घातक!

415

आज देशात अनेक धर्मांचे संघटन निर्माण झाले आहे. त्यामुळे वैचारिक आतंकवाद उफाळत आहे. या वैचारिक आतंकवादामुळे देशाचे तुकडे-तुकडे करण्याची विकृत मानसिकता असून यातून जर समाजाला वाचवायचे असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची गरज आज खऱया अर्थाने आपल्याला असल्याचे प्रतिपादन योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी अमरावती नजीकच्या गुरुकुंज मोझरी आश्रमात केले.

राष्ट्रसंतांच्या 51 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित मौन श्रद्धांजली सोहळय़ाचे प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामदेवबाबा हे व्यासपीठावरून बोलत होते. त्यांनी सांगितले की, राष्ट्रधर्म, सेवाधर्म आणि मानवता धर्म याचा त्रिवेणी संगम असलेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पावनभूमी ही गुरुकुंज असल्याचे सुद्धा स्वामी रामदेवबाबा यांनी सांगितले.

कार्यक्रमाला योगगुरू स्वामी रामदेवबाबांसह त्यांचे शिष्य आनंददेव महाराज, ध्यानगुरू डॉ. कमलेश पटेल, अंबादास महाराज, खोंडे महाराज, आनंददेव महाराज, डॉ. उद्धव गाडेकर महाराज, प्रकाश वाघ, लक्ष्मण गमे, जनार्दन बोथे, दामोदर पाटील, यशोमती ठाकूर आदींसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.

हजारो भाविकांच्या उपस्थितीत गोपालकाला
पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 51 व्या पुण्यतिथी महोत्सवाचा यावेळी समारोप करण्यात आला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत गोपालकाल्याचा कार्यक्रम पार पडला.

आपली प्रतिक्रिया द्या