
मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकातील ‘राणा’ या श्वानाचे उपचारादरम्यान निधन झाले. राणा हा सात वर्षे सात महिन्यांचा होता.
स्पह्टके शोधण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर जानेवारी 2016 साली लॅब्रोडॉर जातीचा श्वान असलेला राणा मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकात दाखल झाला होता. तेव्हापासून राणा याने बॉम्ब कॉल, थ्रेट कॉल, संशयित वस्तू याची तपासणी करणे, व्हीव्हीआयपी / व्हीआयपी यांचे मुंबई भेटीदरम्यान घातपातविरोधी तारासणी करणे, मर्मस्थळे यांची नियमित तपासणी करणे इत्यादी घातपातविरोधी तपासणीमध्ये यशस्वीरीत्या सहभाग घेतलेला आहे. राणा याला पोटाचा विकार झाल्याने त्याच्यावर परळ येथील बाई साकराबाई पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, उपचार सुरू असतानाच मंगळवारी राणाचे निधन झाले. राणावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

























































