1 / 9
पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील देशातील पहिल्याच भव्य ‘मुक्त पक्षी विहारा’चे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बिबट्या, अस्वल, तरस, कोल्हा आणि कासव यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या दालनांचे देखील लोकार्पण झाले
यामध्ये बजरीगर, क्रौंच, हॅरॉननाईट, पेलीकन, करकोचा (स्टॉर्क), सारस, मकाव यासारख्या विविध 100 पक्ष्यांचा समावेश आहे.
या ठिकाणी पाण्यातील कासव अर्थात ‘टर्टल’ व जमिनीवरील कासव अर्थात ‘टॉरटॉईज’ यांच्यासाठीही दालन बनवण्यात आले आहे.
























































