रणवीरच्या ‘नटराज शॉट’वर नेटकऱ्यांची डोक्यालिटी, मीम्स झाले व्हायरल

1218

हिंदुस्थानच्या क्रिकेट विश्वात 1983 साली घडलेला इतिहास ’83’ या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटात कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी रणवीरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून कपिल यांच्या रुपात फलंदाजी करत असतानाचा फोटो शेअर केला होता. या फोटोत त्याने कपिल देव यांचा सुप्रसिद्ध नटराज शॉट जिवंत केल्याचं दिसत होतं. गोलंदाजाने फेकलेला चेंडू जोरदारपणे टोलवताना फलंदाजाच्या शरीराची होणाऱ्या नटराजासारख्या स्थितीमुळेच या शॉटला नटराज शॉट असं म्हटलं जातं. कपिल देव यांच्या तुफान फटकेबाजीची एक खासियत असणारा हा नटराज शॉट रणवीरच्या या फोटोमुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला होता.

पण, रणवीरच्या इतर लूक्सवरून जसे मीम्स व्हायरल होतात, तसे या लूकवरूनही होत आहेत. कधी जोरदार पडणाऱ्या पावसापासून स्वतःला वाचवताना तर क्रिकेटपटूच्या वेशभूषेत घागऱ्याची सरमिसळ करत गरब्याची स्टेप करून दाखवताना, तर कधी ट्रेनमधल्या गर्दीत असे धम्माल मीम्स तयार करून व्हायरल करण्यात आले आहेत. या मीम्सनाही तूफान लोकप्रियता मिळत आहे.

पाहा काही धम्माल मीम्स-

आपली प्रतिक्रिया द्या