ज्या मुलीवर होत होता बलात्कार ती निघाली HIV पॉसिटिव्ह, दोघांना अटक

1945

बिहारमध्ये एका मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच ज्या मुलीवर बलात्कार होत होता ती एचआयव्ही बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिहारमध्ये एक तरुणी 20 जानेवारी रोजी पाटण्याहून परतत येत होती. तेव्हा रात्री उशिरा गाडीतून उतरताना दोन नराधमांनी तिला रेल्वेच्या डब्यात ओढून नेले. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी रेल्वे पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करत होते. तेव्हा या डब्याची खिडकी आणि दरवाजे बंद असल्याचे त्यांना संशय आला. डब्यात जाऊन पाहिले तर एक तरुण मुलीवर बलात्कार करत होता तर दुसरा त्याचा व्हिडीओ काढत होता. रेल्वे पोलिसांना पाहताच दोघेही पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी दोघांना पकडून तरुंगात टाकले.

मुलीला जेव्हा मेडिकल चेकअपसाठी पाठवले असता ती एचआयव्ही बाधित असल्याचे कळाले. त्याच्या उपचारासाठीच ती पाटण्याला गेली होती अशीही माहिती समोर आली. सध्या पीडित मुलीवर सरकारी इस्पितळात उपचार सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या