
घराजवळील मंदिरात खेळत असताना अज्ञाताने दुसरीत शिकणाऱ्या आठ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना तीन दिवसांपूर्वी रात्री आठच्या सुमारास सुतारवाडी गावठाणातील मारुती मंदीरालगत घडली.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तिविरोधात पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असून पाषाण येथील सुतारवाडी परिसरात राहण्यास आहे. तीन दिवसांपूर्वी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुलगी मारुती मंदिराजवळ असणाऱ्या मोकळ्या मैदानात खेळत होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने तिला पकडून एका कोपऱ्यात नेले. त्याठिकाणी त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलगी ओरडल्याने आरोपीने तिला बोचकरून पळ काढला. घटनेनंतर मुलगी रडत- घरी गेल्यानंतर लैंगिक अत्याचाराची घटना उजेडात आली. त्यांनतर मुलीच्या आईन चतुःशृंगी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक माया देवरे अधिक तपास करीत आहे.

























































