लग्नाचे प्रलोभन दाखवत विवाहितेवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

आपण पत्नीपासून घटस्फोट घेऊ, तूपण पतीपासून घटस्फोट घे, असे सांगत विवाहितेला लग्नाचे प्रलोभन दाखवत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना वाकडच्या डांगे चौक श्लोका लॉजमध्ये 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान घडली आहे. सागर हिमांशू शेठ (वय 31, रा. ग्लोबल सिटी, विरार पश्चिम) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने गुरुवारी (दि. 17) वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर शेठ याने पीडित विवाहितेला लग्नाचे प्रलोभन दाखवले. त्यासाठी तिला तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्यास सांगितले. आरोपी सागर याचेही लग्न झाले असून आपणही आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याचे त्याने विवाहितेला सांगितले. दोघांनी आपापल्या जोडीदारांपासून घटस्फोट घेतल्यानंतर आपण लग्न करू, असे प्रलोभन दाखवत त्याने विवाहितेला डांगे चौकातील श्लोका लॉज येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत विवाहितेने 15 दिवसानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.