परळीच्या मिरवटमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळी तालुक्यातील मिरवट येथे शेतात काम करत असणाऱ्या 22 वर्षीय विवाहितेव दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगद केशव भदाडे (वय – 40) रा. मिरवट व साजन तिडके (वय – 30, रा. भोगलवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

पीडिता आपल्या घराजवळील शेतामध्ये काम करत असताना आरोपींनी ती एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर बलात्करा केला. झाला प्रकार कोणाला सांगितल्याल तुझ्यासह कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी आरोपींनी दिलाी. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये आरोपींविरुद्ध कमल 376 (ड), 323 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.